आपला दवाखाना परिसर झाला स्‍वच्छ

आपला दवाखाना परिसर झाला स्‍वच्छ

धारावी, ता. २८ (बातमीदार) : धारावीतील दिलीप कदम मार्गावरील शहीद गोपीनाथ कॉलनी येथील कचऱ्याचा डब्बा हलवून त्या जागी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एच.बी.टी.) हा ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. यामुळे विभागातील रहिवाशांना कचरा टाकण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे ‘आपला दवाखाना’समोरच रहिवासी नाईलाजाने कचरा टाकत आहेत. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेने हा परिसर दररोज साफ करण्यास सुरुवात केली आहे.
पालिकेने येथे ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यापूर्वी येथे नागरिकांसाठी कचऱ्याचा डब्बा असायचा; मात्र आता हा डब्‍बा हटवल्‍याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच दवाखाना बंद असताना येथे वाहेनेही उभी केली जात आहेत. यामुळे स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करत होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालिकेने दवाखान्यासमोरील कचरा दररोज उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्‍हणजे या ठिकाणी दवाखाना सुरू करू नये त्यामुळे स्थानिकांना कचरा टाकण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागेल, याकडे माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी पालिकेचे लक्ष वेधले होते; तरीही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष करत ‘आपला दवाखाना’ सुरू केला असल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com