नागझरी सरपंचांचा जिजाऊ संघटनेत प्रवेश

नागझरी सरपंचांचा जिजाऊ संघटनेत प्रवेश

कासा (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली गणू पारधी यांनी कार्यकर्त्यांसह शनिवारी (ता. २७) नीलेश सांबरे यांच्या उपस्थितीत जिजाऊ संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी जिजाऊ संघटना जिजाऊ जिल्हाध्यक्ष जावेद खान, तलासरी तालुका अध्यक्ष वनशा दुमाडा, तलासरी तालुका युवा अध्यक्ष राहुल दादोडा, सदस्य अमोल उंबरसाडा आदी पदाधिकारी उपस्थित होते. नीलेश सांबरे यांनी ग्रामीण भागांतील गोर गरिबांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि शिक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आपण सर्व एक परिवार असून एकत्र समाजासाठी काम करण्याचे सांगून सर्वांचे अभिनंदन केले. तसेच कोणतीही संकट आले असता जिजाऊ संघटना नागरिकांच्या पाठीशी राहील, असे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com