birth baby
birth baby sakal

Mumbai : मुलांच्या हसण्याच्या, किंकाळ्यांच्या आवाजात सायरन वाजणार; मुंबईत लवकरच ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका

गरोदरपणात काही समस्या असल्यास महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच बालक आजारी असल्यास त्यालाही ही रुग्णवाहिका सेवा मिळू शकणार आहे.

मुंबई - रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून मुंबईकर अनेकदा घाबरतात, पण पुढच्या महिन्यापासून मुंबईकरांना हे दृश्य बदलताना दिसेल. काही रुग्णवाहिकांचे सायरन एखाद्या नवजात बाळाच्या रडण्यासारखे वाजणार आहेत. माता आणि बाळांना आनंद देणारी ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सेवा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू होत आहे.

 birth baby
Mumbai : गोरेगाव भागात चाकूने भोसकून एकाची हत्या; मारेकरी अटकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तेथे खिलखिलाट रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आता ही सेवा मुंबईत सुरू होणार आहे. या सेवेची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गेल्या महिन्यात केली होती. आता ती प्रत्यक्षात येण्याला सुरुवात झाली आहे. त्याला मुंबईत मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे.

 birth baby
Mumbai : प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध, रिक्षाचालकाला दोघांनी लुटले

सुरुवातीला ५ रुग्णवाहिका
मुंबईत सुरुवातीला ५ रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ती मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. ही रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे मोफत असेल. या रुग्णवाहिकेचे वातावरण विशेषत: गरोदर महिला व बालकांसाठी अल्हाददायक बनवण्यात आले आहे.

अशा पद्धतीने चालणार
गरोदरपणात काही समस्या असल्यास महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच बालक आजारी असल्यास त्यालाही ही रुग्णवाहिका सेवा मिळू शकणार आहे. ही रुग्णवाहिका आनंददायी वातावरणात रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासोबतच नवजात अर्भकाला रुग्णालयातून घरी आणण्यासही मदत करेल.

 birth baby
Pune Crime : हाताची नस कापून बाकड्यावर बसली अन्.. अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलीने केली प्रियकराची हत्या

अशी असेल रुग्णवाहिका
रुग्णवाहिकेचा सायरन अनेकांच्या हृदयात घर करून जातो. या आवाजाचा परिणाम गर्भवती महिला आणि नवजात बालकांवरही होतो. म्हणूनच या रुग्णवाहिकेचा आवाज लहान मुलाच्या हसण्याचा आणि किंचाळण्याचा असेल. रुग्णवाहिकेच्या आत छान चित्रे आणि खेळणी असतील. रुग्णवाहिकेच्या बाहेरील भागावर रंगीत चित्रेही असतील. याशिवाय नवजात बालकांच्या टप्प्याटप्प्याने लसीकरणाची माहितीही उपलब्ध होणार आहे. यासोबतच जवळच्या रुग्णालयाचीही माहिती दिली जाणार आहे.

 birth baby
Mumbai Metro : मुंबई मेट्रोचे प्रवाशांना मिळणार विमा सुरक्षा कवच

मनोचिकित्सक काय म्हणतात?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले, की या उपक्रमाकडे दोन्ही बाजूंनी पाहावे लागेल. पहिली बाब म्हणजे या रुग्णवाहिकेत जाणाऱ्या बाळांना आणि मातांना एक सुखद अनुभव मिळणार आहे. त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळेल; मात्र आपत्कालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मार्गात यातून अडथळे निर्माण न होण्यासाठी प्रयत्नही करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com