उल्हासनगरात प्रदूषण कमी करण्यासाठी लघुपटाद्वारे जनजागृती

उल्हासनगरात प्रदूषण कमी करण्यासाठी लघुपटाद्वारे जनजागृती

उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : शहरातील प्रदूषण कमी व्हावे, यासाठी नागरिकांमध्ये लघुपटांद्वारे जनजागृती करण्यात आली. उल्हासनगर महापालिकेच्या पर्यावरण विभाग तसेच पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पाच घटकांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्र शासनाच्या मिशन लाईफ तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे ‘माझी वसुंधरा अभियान’ या उपक्रमाअंतर्गत उल्हासनगर महापालिकेकडून हा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात पर्यावरणातील भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पाच घटकांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या चांगल्या सवयींचा वापर केला पाहिजे, याबाबत लघूपटांतून जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना पर्यावरणपुरक शपथ देखील देण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत पालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ. करूणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाच्या विभागप्रमुख विशाखा सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
....
यावर केले मार्गदर्शन
पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी यांनी सिंगल युज प्लास्टिक बंदी, नदी, तलाव यांचे संवर्धन, कचरा वर्गीकरण, कचऱ्यापासून घरच्याघरी खत तयार करणे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच जैवविविधता जपणे, मिशन लाईफ याद्वारे नागरिकांना वीज, पाणी आणि अन्नाची बचत, कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आत्मसात केल्या पाहिजेत या विषयावरील लघुपट प्रदर्शित करून मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com