स्वातंत्र्यवीर सावरकरांना भिवंडी महापालिकेतर्फे अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भिवंडी महापालिकेतर्फे अभिवादन

भिवंडी (बातमीदार) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महान कवी होते. कविमनाच्या या क्रांतिकारक नेतृत्वाने मराठी भाषेला दिशादर्शक ठरतील, असे महान ग्रंथ दिले आहेत. अशा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. १८५७चे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, काळे पाणी, माझी जन्मठेप, जात्युच्छेदक निबंध, संन्यस्त खड्ग, कमता, हिंदुपदपादशाही अशी एकापेक्षा एक सरस पुस्तके सावरकरांनी लिहिलेली आहेत. ही सर्व पुस्तके देशभक्तीने प्रेरित होऊन लिहिली आहेत. प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावीत, अशी प्रेरणादायी पुस्तके आहेत. "ने मजसी ने परत मातृभूमीता सागरा प्राण तळमळला" हे सावरकरांनी लिहिलेले एक अजरामर असे आर्त भावगीत आहे. तर "जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे'' हे अजरामर असे स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र आजही प्रत्येक भारतीयाला देशभक्तीची आणि देशप्रेमाची प्रेरणा देत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त भिवंडी महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बुशरा सय्यद, प्रभाग अधिकारी फैसल तातली, अधीक्षक मकसुम शेख, कल्पना शेंगाळ, शेखर चौधरी, नितेश चौधरी इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com