महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये घट

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये घट

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये घट
७४ टक्‍के आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश
केदार शिंत्रे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबईत महिलांच्या हत्येच्या, अत्याचाराच्या असंख्य घटना रोज समोर येत असतात. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या ४ महिन्यांत महिला अत्याचाराच्या प्रतिदिन १६ गुन्ह्यांची नोंद होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे; मात्र समाधानकारक बाब म्हणजे महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्‍के घटली असल्याचे मुंबई पोलिसांची आकडेवारी सांगते. तसेच ७४ टक्‍के प्रकरणांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचेही या आकडेवारीतून समोर आले आहे.

प्रतिदिन १६ गुन्ह्यांची नोंद
जानेवारी ते एप्रिल या पहिल्या चार महिन्यात मुंबईतील ९३ पोलिस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराचे १९७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये १४७० प्रकरणे सोडवली असल्याचा दावा पोलिसांच्या आकडेवारीत करण्यात आला आहेत. अशाप्रकारे मुंबई पोलिस महिला अत्याचाराच्या प्रतिदिन १६ गुन्ह्यांची नोंद करत असल्याची माहिती आहे. म्हणजे महिन्याला ४८० गुन्हे महिला अत्याचाराचे नोंदवण्यात आले आहेत.

पोलिसांच्या यशाचे प्रमाण ७४ टक्‍के
जानेवारी ते एप्रिलपर्यंत मुंबई पोलिसांनी बलात्काराचे ३२५, अपहरणाचे ४०७ आणि हुंडाबळीचे २२८ गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी २८६ गुन्हे बलात्काराचे आणि ३३२ अपहरणाचे गुन्ह्यांची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आले; तर हुंड्यासाठी छळाची फक्त ८६ प्रकरणे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. एकूण या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत महिला अत्याचाराच्या ७४ टक्‍के गुन्ह्यांची उकल मुंबई पोलिसांनी केली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या कालावधीत हा आकडा ६५ टक्के होता.

आकडेवारी २०२३
गुन्हे जानेवारी ते एप्रिल गुन्ह्यांची उकल सक्सेस रेट
बलात्कार ३२५ २८६ ८८%
अपहरण ४०७ ३३२ ८२%
हुंडाबळी २२८ ८६ ३९%


गुन्ह्यांत ५ टक्‍के घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत महिलांविरुद्ध अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये ५ टक्के घट झाल्याची पाहिला मिळते. जिथे गेल्या वर्षी २०२२ सालच्या जानेवारी ते एप्रिल या काळात महिलांवरील अत्याचाराच्या २०७८ गुन्ह्यांपैकी फक्त १३४१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे; तर या वर्षी पहिल्या चार महिन्यांत महिला अत्याचाराचे १९७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये १४७० गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे.

आकडेवारी २०२२
गुन्हे जानेवारी ते एप्रिल २२ गुन्ह्यांची उकल सक्सेस रेट
बलात्कार ३०४ २४७ ८१%
अपहरण ३५७ २५९ ७३%
हुंडाबळी २९५ ७२ २४%

पोलिसांच्या उपाययोजना
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महिला गुन्ह्यांची सुनावणी लवकर होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी ६० दिवसांत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी पोलिस गस्त घालणे, निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एकाकी महिला असतील तर त्यांना घरी नेण्याची व्यवस्था करणे, निर्भया पथक, निर्भया पेटी आणि महिला सुरक्षेसंबंधी इतर महत्त्वाच्या सूचना जारी केल्या. दरम्यान, महिलांची सुरक्षा आणि व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. यामुळेच कदाचित या वर्षी महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर यामुळे तपासाचे प्रमाणही वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com