बेस्टवर सहा हजार कोटींचे कर्ज!

बेस्टवर सहा हजार कोटींचे कर्ज!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः बेस्ट उपक्रमावर सध्या सहा हजार कोटींचे कर्ज आहे. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ पर्यंत ७१२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तब्बस सातशे कोटींची देणी आहेत. बेस्टवर सध्या कर्जाचा डोंगर उभा आहे.

‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर बेस्ट उपक्रमाचा उपक्रम चालतो. तरीही बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवाशांना व वीजग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेस्ट उपक्रम विविध योजना राबवत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणारी बेस्ट आर्थिक संकटात सापडली आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने मदतीचा हात पुढे करत आतापर्यंत चार हजार कोटींची मदत केली आहे. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात आठशे कोटींची मदत करणार आहे. तरीही बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात सापडला आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी, टाटा पॉवर आदींची देणी बाकी आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमावर सद्यःस्थितीत सहा हजार कोटींचे कर्ज आहे, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. जून महिन्यात ५७८ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सेवावृत्तीचे लाभ मिळतात; मात्र डिसेंबर २०२२ ते मे २०२३ पर्यंत ७१२ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांची सातशे कोटींची देणी आहेत. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची देणी लवकरात लवकर देण्यात येतील.
- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

सध्या कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी
विद्युत विभाग ः ५,१४३
परिवहन अभियांत्रिकी विभाग ः ४,३७२
वाहतूक विभाग ः १७,८९३
सामान्य प्रशासन ः १,६०५

एकूण ः २९,०१३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com