उपजिल्हा रुग्णालयातील रिक्ते पदे त्वरित भरा

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्ते पदे त्वरित भरा

खर्डी, ता. ३० (बातमीदार) : आदिवासी तालुका असणाऱ्या शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दुर्गम भागातील रुग्ण विविध उपचारासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे व इतर अत्याधुनिक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे रुग्णांची आर्थिक लूटमार होत आहे. त्याकरिता रुग्णालयातील रिक्त पदे व सुविधा सात दिवसांच्या आत उपलब्ध कराव्यात; अन्यथा सोमवार, ५ जून रोजी रुग्णालयासमोर उपोषणाचा इशारा प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी आरोग्य उपसंचालक आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय शस्त्रक्रिया अधिकारी यांसारखी रिक्त पदे आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरता कायम भरावी. तसेच डायलिसीस, सोनोग्राफी, शस्त्रक्रिया कक्ष या रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवाव्यात आणि रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वसंत पानसरे यांनी सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष वसंत पानसरे, प्रहार सल्लागार वामन केदार, उपाध्यक्ष नरेश सासे, सचिव प्रसाद भोईर, शहर सचिव सचिन कुंभार, युवा आघाडीचे अकिल शेख, नरेश चौधरी, अरीफ शेख, युवा संघटक मयूर किरपण, विपुल पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com