खर्डीत दंत तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्डीत दंत तपासणी शिबिर
खर्डीत दंत तपासणी शिबिर

खर्डीत दंत तपासणी शिबिर

sakal_logo
By

खर्डी, ता. ३० (बातमीदार) : जिजाऊ संघटनेच्या खर्डी विभाग तसेच एसएमबीटी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जनसंपर्क कार्यालयात मोफत दंततपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील ७८ रुग्णांनी लाभ घेतला. यात मोफत तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, मोफत दात साफ करणे, निवडक मोफत औषधे व पुढील उपचारासाठी कूपन देण्यात आले. या कूपनद्वारे पुढील दातांचे उपचार हे अल्पदरात एसएमबीटी येथे करण्यात येणार आहेत. यावेळी जिजाऊ संघटनेचे खर्डी विभागप्रमुख अशोक वीर, समाजसेवक हुसेन शेख, भगवान भोईर, दशरथ मांजे, बाळू मांजे, दीपक तूपांगे, किशोर घरत समन्वयक सुभाष करवर उपस्थित होते.
...
खर्डी : जिजाऊ संस्थेच्या कार्यालयात दंततपासणी शिबिर पार पडले.