‘मानव विकास’च्या निधी अपहाराची चौकशी करा

‘मानव विकास’च्या निधी अपहाराची चौकशी करा

शहापूर, ता. ३० (बातमीदार) : शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या वर्षात लाखो रुपयांच्या निधीचा अपहार झाला आहे. याप्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तालुक्यातील दहिगाव ग्रामस्थांनी शहापूर पंचायत समितीच्या आवारात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
मोहाची फळे, फुले, डिंक व पळसाची पाने आदी वनोपज गोळा करून परिसरातील वनवासींना व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत दहिगाव ग्रामपंचायतीला चार लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. त्यानुसार ग्रामसभा व मासिक सभेची परवानगी घेऊन खर्च करणे अपेक्षित असताना संबंधित मानव विकास समितीने मनमानी कारभार करीत प्रत्यक्षात हा निधी हायड्रॉलिक मशीन, जनरेटर, शिलाई मशीन हे साहित्य खरेदी करण्यासाठी खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे हेच साहित्य खरेदी करण्यासाठी पेसा अंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतूनही खर्च करण्यात आला असल्याचे दाखवण्यात आले असून वनोपज गोळा करण्यासाठी ८२ हजारांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार करण्यात आली होती. मात्र दाद न मिळाल्याने अखेर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून शासकीय निधीचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी दहिगाव ग्रामस्थांनी शहापुर पंचायत समितीच्या आवारात आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
.....
शहापूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत निधीचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी दहिगाव ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com