शंभर मुलींची बँक खाती उघडली

शंभर मुलींची बँक खाती उघडली

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अंतर्गत
शंभर मुलींचे बँकेत खाते

मुंबई, ता. ३१ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वयाची नऊ वर्षे पूर्ण झालेल्या मुलींच्या नावाने बँक खाते उघडण्याची योजना बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या हस्ते मुंबईत सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत ही योजना लागू केली गेली आहे. त्यानुसार त्यांनी नुकतेच पाचवीपर्यंतच्या शंभर मुलींना बँक बचत खाते पासबुकचे वाटप केले. सुनील राणे यांनी उघडलेल्या प्रत्येक खात्यात या मुलींच्या नावे प्रत्येकी एक हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

मुलींसाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यातील ही बचत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. विशेषत: विविध शासकीय योजनांतून जमा होणारी रक्कम त्यांच्या उच्च शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल, असे राणे म्हणाले. ग्रामीण व शहरी भागातील मुलींच्या शिक्षणासाठी तसेच देशभरातील शहीद जवानांच्या मुलींना संगणक, टॅब, सायकल, लॅपटॉपचे मोफत वाटप त्यांनी वेळोवेळी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com