पालघरमध्ये अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक

पालघरमध्ये अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक

पालघर ३१ मे (बातमीदार) : पोलिसांनी शहराच्या पूर्व भागातील गांधीनगर येथे छापा टाकून दोन लाख ४३ हजार रुपयाचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. पालघरमध्ये हे अमली पदार्थ महाविद्यालय व शाळांच्या परिसरात विक्री केले जात असल्याच्या तक्रारी होत्या महाविद्यालयीन व काही शाळकरी मुलं या अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे दिसून आले होते ही बाब पत्रकार बरोबर काही पालकांनीही पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नजरेस आणली होती, याची दखल घेत पोलिस निरीक्षक अनिल विभुते मार्गदर्शनाखाली नारकोटिक सेल्सची स्थापना करण्यात आली. या पथकाने माहितीच्या आधारे चार ठिकाणी छापा टाकून पाच आरोपींना अटक करून २२ किलो २०० ग्रॅम वजनाचा व दोन लाख २३ हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा व वीस हजार सातशे वीस रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख ४३ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अटक आरोपी विरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com