तंबाखू सेवन करणाऱ्या १००० जणांवर कारवाई

तंबाखू सेवन करणाऱ्या १००० जणांवर कारवाई

अलिबाग, ता. १ (बातमीदार)ः तंबाखू खाण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गावागावांत जनजागृती केली जाते. तरीदेखील काहीजण नियम धाब्यावर बसवून तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. अशा एक हजार १६ जणांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करून दोन लाख २२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू असून जिल्हा सामान्य रुग्णालयात यासाठी स्‍वतंत्र तैनात आहे. शाळांपासून गावागावांत, सरकारी कार्यालयांत ठिकठिकाणी माहिती फलकाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. तंबाखूसह धुम्रपानामुळेही आरोग्यावर परिणाम होत असल्‍याने जनजागृती करण्यात येत आहे.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत सल्ला देणे, समुपदेशन करणे, मुख कर्करोगाची तपासणी करणे आदी उपक्रम डॉ. विकास पवार, सुशील साईकर, हितेश जाधव आदींच्या सहभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयमार्फत सुरू आहेत.
तंबाखूचे सेवन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एक हजार १६ जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून दोन लाख २२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केल्‍याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com