वंदे भारतचा लोकार्पण सोहळा रद्द

वंदे भारतचा लोकार्पण सोहळा रद्द

सकाळ वृत्तसेवा
मडगाव, ता. २ : चेन्नईहून हावडाकडे जाणाऱ्या कोरोमंडल या एक्स्प्रेसला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. त्यात ३० हून अधिक प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला असून १५० हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे मडगाव येथे वंदे भारत एक्स्प्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोमंडल एक्स्प्रेस ही बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ समोरून येत असलेल्या मालगाडीला येऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. यात कोरोमंडल एक्स्प्रेसचे १८ डब्बे रुळावरून घसरले; तर अनेक डबे उलटे झाले असल्याने जखमी आणि मृत्यूंचीही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालासोर‍ जिल्ह्यातील रेल्वेच्या भीषण अपघातावर ट्विट करत जखमी झालेले प्रवासी लवकर बरे व्हावेत, अशी भावना व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com