नायगावमधील पाण्याच्या निचऱ्यासाठी पालिका सरसावली

नायगावमधील पाण्याच्या निचऱ्यासाठी पालिका सरसावली

वसई, ता. ६ (बातमीदार) : नायगाव पश्चिमेला पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेत महापालिकेच्या बांधकाम विभागाने काम हाती घेतले असून त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दिलासा मिळणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
नायगाव स्टेशन पश्चिमेकडील सब वे आणि बस स्टॉपजवळील परिसरात पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे रेल्वे प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि बस प्रवासी यांना त्रास होत असतो. संबंधित विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यावर तोडगा म्हणून विरार शहर महापालिका बांधकाम विभागामार्फत पाईप क्रॉसिंग करण्यात येणार आहे. ठेकेदारामार्फत कामाला सुरुवात करण्यात आली असून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेतच पूर्ण करण्यात येणार आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व नायगावचे रहिवासी आशिष वर्तक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com