नवी मुंबई पालिका अभियंत्याची लाचखोरी प्रकरणातून मुक्तता

नवी मुंबई पालिका अभियंत्याची लाचखोरी प्रकरणातून मुक्तता

ठाणे, ता. ३ (वार्ताहर) : लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले नवी मुंबई पालिकेतील अभियंता राकेश दयाराम निमेश (४३) यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सरकारी पक्षाला सिद्ध करण्यात अपयश आले आहे. यामुळे लाचलुचपत खात्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. बी. बांगडे यांनी राकेश यांची निर्दोष मुक्तता केली.
लाचखोरीच्या गुन्ह्यात अडकलेले नवी मुंबई महापालिका अभियंत्यांनी दोन व्यक्तींकडून पाण्याच्या पाईपलाईनवर टॅप मारण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयाची मागणी केली होती. ही घटना राकेश निमेश यांच्या कार्यालयात १६ नोव्हेंबर, २००७ मध्ये घडल्याची माहिती विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. ॲड. विजय साली यांनी आरोपपत्राच्या आधारावर निमेश यांचा कुठलाही सहभाग हा लाच मागण्यात किंवा लाच स्वीकारण्यात नसल्याने त्यांची मुक्तता करावी, असा युक्तिवाद केला. लाचलुचपत खात्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. बी. बांगडे यांनी दिलेल्या निकालात आरोपी राकेश निमेश हे पालिका अधिकारी असल्याने टॅप मारण्याची परवानगी ही त्यांची ड्युटी आहे. ज्यावेळी तक्रारी किंवा छापेमारी केली त्या वेळी कुठल्याही तक्रारदारीशी निगडित काम शिल्लक नव्हते. त्यामुळे निमेश यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याला न्यायालयात सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे न्यायमूर्ती डी. बी. बांगडे यांनी निमेश यांची निर्दोष मुक्तता केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com