सत्ता असताना सामान्यांचे प्रश्न का सोडवले नाही ?

सत्ता असताना सामान्यांचे प्रश्न का सोडवले नाही ?

सत्ता असताना सामान्यांचे प्रश्न का सोडवले नाहीत?
खासदार श्रीकांत शिंदे यांचा नागरिकांच्या संवाद दौऱ्यात सवाल

घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) ः अनेक वर्षे महापालिका उद्धव ठाकरे गटाकडे होती. अडीच वर्षे ते राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना का सोडवता आले नाही, असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी घाटकोपरमधील नागरिकांच्या संवाद दौऱ्यात बोलताना केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागला असून श्रीकांत शिंदे यांनी विभागवार दौरा सुरू केला आहे. रमाबाई नगरमधील पक्षाच्या शाखेच्या भेटीदरम्यान शिंदे यांनी कार्यकर्ते व नागरिकांशी सुसंवाद साधला. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, प्रवक्ते शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांचे प्रश्न व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी श्रीकांत शिंदे यांचा दौरा आखण्यात आला होता. शिंदे यांनी कामराज नगर, रमाबाई नगर व शिवाजी नगरमध्ये भेट दिली. श्रीकांत शिंदे म्हणाले, की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. आज एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. प्रत्येक विभागात ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना चालण्यासाठी चांगले रस्ते बनवले जात आहेत. एवढी विकासकामे होत असताना विरोधक ‘खोके खोके’ म्हणून चिडवत आहेत. ज्यांना खोके कळतात तेच अशी भाषा वापरू शकतात, असेही ते म्हणाले.
दीपक केसरकर यांनीही नागरिकांशी संवाद साधला. सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रखडलेली एसआरएची कामे मार्गी लावू. सामान्यांना हक्काच्या घरात आनंदाने व सुखाने राहता यावे, यासाठी आपण प्रयत्न करू, असेही केसरकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com