जागतिक सायकल दिनानिमित्त मिलिंद सोमण सायकलफेरीत

जागतिक सायकल दिनानिमित्त मिलिंद सोमण सायकलफेरीत

मुंबई, ता. ३ : फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांनी आज लाइफलाँग ऑनलाईनने आयोजित केलेल्या सायकल फेरीत अंधेरी येथे भाग घेतला. मिलिंद सोमण यांनी २५० हून अधिक सहभागींसोबत मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवली. चांगले आरोग्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणाच्या दिशेने मुंबईकरांना एक पाऊल पुढे टाकण्यास प्रोत्साहित करणे हा या सायकलफेरीमागील उद्देश होता. जागतिक सायकल दिन दरवर्षी तीन जून रोजी साजरा केला जातो. मिलिंद सोमण आणि लाइफलाँग ऑनलाईनतर्फे नेहमीच फिटनेस जागृतीसाठी धावणे, सायकल फेरी आदी विविध उपक्रम आयोजित केले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com