‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ठाण्याची उत्तुंग कामगिरी

‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ठाण्याची उत्तुंग कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : लखनौ येथे २९ ते ३१ दरम्यान पार पडलेल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३’ स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदकांवर नाव कोरले आहे. तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके आणि स्पर्धेत तीन पदके जिंकणारी निधी ही एकमेव खेळाडू ठरली आहे.
निधी सिंग हिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये कांस्य पदक मिळवले. निधीने ४०० मीटरमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. तर सानिका नाटे हिने ४ x १०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले. सानिका हिने शर्यतीला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. आकांक्षा गावडे हिने ४ x ४०० मीटर रिलेच्या पहिल्या लेगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. तिने वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. निधी, सानिका आणि आकांक्षा यांनी मुंबई विद्यापीठाला द्वितीय उपविजेते बनवण्यात योगदान दिले. विशेषतः निधीचे योगदान मोठे होते.

मी माझ्या कामगिरीने खूप खूश आहे. जून महिन्यात होणाऱ्या वरिष्ठ आंतरराज्य ॲथलेटिक चॅम्पियनशिप आणि जागतिक विद्यापीठ चाचणीसाठी ही चांगली तयारी असेल.
- निधी सिंग

निधी खूप चांगली कामगिरी करत आहे. तिने ४०० मीटरमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. मला खात्री आहे, ती ४०० मीटर हर्डल्समध्येही चांगली कामगिरी करेल. अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाणे जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातील कोणीही अशी कामगिरी केलेली नाही. निधीने २०२०मधील ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत गुवाहाटीमध्ये चार पदके जिंकली होती. मला आशा आहे, ठाणे पालिका तिच्या कामगिरीची दखल घेईल आणि तिला जागतिक विद्यापीठ खेळांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येईल. सानिका आणि आकांक्षा यांनी आपापल्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली.
- नीलेश पाटकर, प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com