घरांसाठी गिरणी चाळ संघर्ष समिती आक्रमक

घरांसाठी गिरणी चाळ संघर्ष समिती आक्रमक

मुंबई, ता. ३ : आगामी पालिका निवडणुकीपूर्वी ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या (कार्पेट) घरांची मागणी मान्य करून, सर्व परवानग्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय देण्याची मागणी गिरणी चाळ संघर्ष समितीने केली आहे. त्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने येत्या ७ जून रोजी भारत माता सिनेमा पदपथावर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष जनार्दन देशमुख यांनी दिला आहे. केंद्र सरकार गिरणी चाळींचा पुनर्विकास करण्यास असमर्थ असून राज्य सरकारनेच हा पुनर्विकास करावा, या मागणीचा प्रश्न आमदार कालिदास कोळंबकर यांनी २५ मार्च रोजी विधानसभेत मांडला होता. त्यावर ११ गिरणी चाळींचा पुनर्विकास करणार असल्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते; परंतु ५०० चौरस फूट (कार्पेट) क्षेत्राबाबत तपासून पाहू, असे आश्वासन देताना गिरणी चाळीतील रहिवाशांची फडणवीस यांनी थट्टा केल्याचा आरोप
समितीने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com