Sun, Sept 24, 2023

मीठबंदर रोडवर आढळली जखमी कोकिळा
मीठबंदर रोडवर आढळली जखमी कोकिळा
Published on : 4 June 2023, 2:53 am
ठाणे, ता. ४ (वार्ताहर) : मीठबंदर रोडवरील वाल्मिकी सोसायटीजवळ एक कोकिल पक्षी जखमी अवस्थेत आढळला. कोकिलला प्राणी-पक्षी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र भरत मोरे यांनी दिली. वाल्मिकी सोसायटीजवळ एक कोकिल पक्षी जखमी अवस्थेत ज्येष्ठ नागरिक वसंत बोबडे यांनी दिसून आला. या वेळी त्यांनी पालिकेचे कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांना त्वरित संपर्क केला. भरत मोरे यांनी कोकिल पक्ष्याला पकडून ठाणे एसपीसीए (प्राणी पक्षी रुग्णालय) येथे उपचारासाठी घेऊन गेल्याचे सांगितले.