डोंबिवलीत पाहायला मिळाला रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

डोंबिवलीत पाहायला मिळाला रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

डोंबिवली, ता. ५ (बातमीदार) : रिक्षात विसरलेला मोबाईल रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे प्रवाशाला परत केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. म्हारळ येथे राहणारे नरेश भगत हे प्रवासी कल्याण स्टेशन ते उल्हासनगरदरम्यान प्रवास करत असताना वीस हजार किमतीचा मोबाईल रिक्षात विसरले. भगत यांच्या मोबाईल फोनमध्ये महत्त्वाचा डाटा व अत्यावश्यक नंबर होते. मोबाईल हरवल्याचा प्रकार त्यांनी कल्याण स्टेशनवरील लोहमार्ग वाहतूक पोलिसांना सांगितला. या बाबतीत चौकशी केली असता समजले, की रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते तसेच रिक्षाचालक अरविंद भोसले यांच्या रिक्षात हा मोबाईल हे प्रवासी विसरले होते. रेल्वे वाहतूक पोलिस अंमलदार मंगेश भोसले, गोपाळ सावंत यांच्या समक्ष रिक्षाचालक अरविंद भोसले यांनी प्रामाणिकपणे प्रवासी नरेश भगत यांना मोबाईल परत केला. अरविंद भोसले यांचे रिक्षा टॅक्सी चालक-मालक असोसिएशन अध्यक्ष प्रणव पेणकर व पदाधिकारी यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com