एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : तापमान वाढल्याने घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना सोमवारी (ता. ५) एसी लोकलच्या तांत्रिक बिघाडाचा फटका सहन करावा लागला. विरार-चर्चगेट जलद एसी लोकलमधील दोन डब्यांतील वातानुकूलित यंत्रणा काम करत नसल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला. बिघाड दुरुस्त न झाल्याने ही एसी लोकल चर्चगेटला पोहोचल्यावर रद्द करण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर आली. त्यानंतर त्या लोकलऐवजी साधी लोकल चालवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी १२.२० ची विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यांतील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. त्यामुळे प्रवाशांचा श्वास गुदमरात होता. प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वेकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने बोरिवली स्थानकात बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला; पण एकाच डब्यातील वातानुकूलन यंत्रणा सुरू झाली. दुसऱ्या डब्यातील वातानुकूलन यंत्रणा मात्र सुरू झाली नाही. चर्चगेट स्थानकावर पोहचल्यावर ही लोकल रद्द करून कारशेडमध्ये पाठवण्यात आली आहे. या घटनेमुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा एकामागे एक खोळंबल्या होत्या. परिणामी अनेक जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
...
प्रवाशांत संताप
उन्हाळा असल्याने उकाडा खूपच वाढलेला आहे. त्यामुळे प्रवासी तिपटीने पैसे मोजून एसी लोकलचा प्रवास करत आहेत. पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने एसीविना मुंबईकरांना प्रवास करावा लागतो. त्यामळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com