दुचाकी अपघातात माय-लेकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात माय-लेकाचा मृत्यू

कासा, ता. ५ (बातमीदार) : दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच दुचाकी चालकासह दोन तरुणींना गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे गावाच्या हद्दीत उड्डाण पुलावर ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीचालकासह एकाच कुटुंबातील एक महिला, लहान मुलगा आणि दोन तरुणी असे एकूण पाच जण प्रवास करत होते. हे पाचही पालघर तालुक्यातील असून धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात जात असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात केरू डवला (वय ४०), जैविक डौला (वय ७) या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला; तर बारकू डवला (वय ४५), सुवर्णा डौला (वय १३) व प्राची डौला (वय १०) हे गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com