जिल्हाधिकाऱ्यांची कसारा गाव तलावाला भेट

जिल्हाधिकाऱ्यांची कसारा गाव तलावाला भेट

खर्डी, ता. ६ (बातमीदार) : कसारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाळ काढण्याच्या सुरू असलेल्या कामाची ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पाहणी केली. भिवंडी, मुरबाड व शहापूर तालुका नियोजित शासकीय दौऱ्यात शिनगारे यांनी कसारा गावच्या तलावाला भेट देऊन काम अधिक गतिमान करून १५ दिवसात गाळमुक्त तलाव करण्याचे आदेश स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व महसूल विभागाला दिले. यावेळी कसाराचे सरपंच अशोक वीर यांनी स्थानिक गावठाण जागेत राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न उपस्थित करून येथील समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कसारा तलावाचे गाळ काढण्याच्या सुरू असलेल्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दरम्यान स्थानिक सरपंच प्रकाश वीर,उपसरपंच शरद वेखंडे यांनी जलसाठा वाढण्यासाठी खोलीकरण व रुंदीकरण होईल, त्या उद्देशाने तलावातील अधिकाधिक गाळ काढण्याची संबंधित सेवाभावी संस्थांना सूचना करण्याची जिल्हाधीकारी यांना विनंती केली. यावर शिनगारे यांनी पोकलेन व डंपर लावून कामाला गती देत पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com