डीएनएस बॅंकेचे आर्य चाणक्य प्रशिक्षण केंद्र

डीएनएस बॅंकेचे आर्य चाणक्य प्रशिक्षण केंद्र

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : डोंबिवली नागरी सहकारी बॅंकेने आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे आर्य चाणक्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत या केंद्राचे उद्‌घाटन भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक व सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्नेह विकास या बॅंकेच्या त्रैमासिक गृहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची माहिती दिली. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या नागरी सहकारी बँकांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच कर्जविषयक धोरण निश्चित करताना अधिकारीवर्गानेही आपली मते मांडली पाहिजेत, असे आग्रही प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत मराठे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर योगेश वाळुंजकर यांनी उपस्थित व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com