मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट!

मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट!

Published on

पार्सल वाहतुकीतून मध्य रेल्वेची
६७.७७ कोटी रुपयांची कमाई

मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेने तीन महिन्यांत प्रवासी भाड्याव्यतिरिक्त २८.६२ कोटी आणि पार्सल वाहतुकीतून ६७.७७ कोटींचा विक्रमी महसूल गोळा केला आहे. मध्य रेल्वेने नॉन-फेअर आणि पार्सल महसुलामध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. एप्रिल ते जूनदरम्यान मध्य रेल्वेची कामगिरी उत्कृष्ट झाली. विना-भाडे महसुलात २८.५२ कोटींचा विक्रमी महसूल मिळाला. यंदा १०२.३३ टक्क्यांनी महसुलात वाढ झाली आहे. पार्सल महसुलातही मध्य रेल्वेने विक्रमी कामगिरी केली आहे. एप्रिल ते जूनदरम्यान पार्सल महसुलाद्वारे ६७.७७ कोटींची विक्रमी कमाई केली. मागील वर्षीच्या एप्रिल ते जून २०२२ मध्ये ६४.६६ कोटींची कमाई केली होती; मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा ४.९७ टक्के अधिक कमाई आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षात जूनपर्यंत एकूण ९२ पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या. २९ पार्सल ट्रेनच्या फेऱ्यांतून रेल्वेने ५.७८ कोटींची कमाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.