तांत्रिक बिघाड लोकल सेवा खोळब !

तांत्रिक बिघाड लोकल सेवा खोळब !

Published on

तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रवाशांचा खोळंबा

मेगाब्लॉक घेऊनही बिघाड सत्र सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी (ता. ६) सकाळी लोकल सेवा विस्कळित झाली होती. पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकांत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता; तर मध्य रेल्वेवर पावसामुळे लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कामावर लेटमार्क लागल्याने नोकरदारांनी नाराजी व्यक्त केली.
वसई रेल्वे स्थानकात सकाळी ९ च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने चर्चगेटकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती. याबाबत माहिती मिळताच रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने बिघाड दुरुस्त केला; मात्र या कालावधीत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. पश्चिम रेल्वे उपनगरी लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडून गाड्या १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क लागला. पश्चिम रेल्वेवर सतत्याने तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
--------------------
मध्य रेल्वेही विलंबाने
मध्य रेल्वे मार्गावरही लोकल गुरुवारी १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले होते. यामुळे नागरिकांना बराच वेळ लोकलची वाट पाहत उभे राहावे लागत असल्याने रेल्वे स्थानकांवर खोळंबावे लागले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.