रुळाखालील खडी वाहून गेल्याने नागपूर- मुंबई रेल्वे गाड्यांना उशीर

रुळाखालील खडी वाहून गेल्याने नागपूर- मुंबई रेल्वे गाड्यांना उशीर

Published on

सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. ११ : मुसळधार पावसामुळे रुळाखालील खडी वाहून गेल्याने मुंबईला जाणारी- येणारी रेल्वेवाहतूक विस्कळित झाली होती. पहाटे तीनपर्यंत युद्धपातळीवर काम केल्याने मुंबईला जाणारी वाहतूक पूर्ववत झाली. हावडा-एलटीटी ही पहिली गाडी मुंबईला रवाना झाली. अनेक प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागला.
भुसावळ ते नागपूर दरम्यान माना आणि मूर्तीजापूर नजीक सोमवारी सायंकाळी सातला रुळाखालील खडी जोरदार पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक काल रात्री थांबविण्यात आली होती. काही गाड्या अन्य मार्गे नागपूरला वळविण्यात आल्या आहेत. नागपूर-मुंबई, नागपूर-भुसावळ, नागपूर-पुणे तसेच अमरावती-पुणे या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. गुजरातला जाणार्या गाड्या बैतूल-खांडवा भुसावळ मार्गाने वळविण्यात आल्या. मुंबईहून निघालेली मुंबई-नागपूर ही गाडी काल भुसावळपर्यंतच धावली. या गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीत बसवून बैतूल-खांडावा बैतूल मार्गाने नागपूरला रवाना करण्यात आले. त्यांना नेहमीपेक्षा दुप्पट वेळ प्रवासाला लागला. नागपूरहून मुंबईला येणार्या गाड्या मध्यप्रदेशमार्गे भुसावळला आल्या. मुंबई- नागपूर सेवाग्राम ही गाडी रद्द करण्यात आली. पुण्याहून नागपूरला जाणारी गाडी अकोल्यापर्यंत धावली. पावसाने विश्रांती घेतली, तर चार तासात हे काम करून वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. भुसावळ वर्धा इटारसीमार्गे सिंकदराबादाला जाणारी गाडी आज अकोला नांदेडमार्ग वळविण्यात आली. गोंदिया -मुंबई विदर्भ एक्सप्रेस नरखेड इटारसी भुसावळमार्गे वळविण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.