रविवारी सरसंघचालक मोहन भागवत ठाण्यात

रविवारी सरसंघचालक मोहन भागवत ठाण्यात

Published on

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २६ : ठाण्यातील ग्लोबल सेंटर येथील धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. बाळकुम येथील रुस्तमजी गृहसंकुलातील भूखंड ठाणे महापालिकेला ‘टाऊन सेंटर’ या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाला होता. या ठिकाणी एक हजार खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कर्करोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेत, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही होते. या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपाठोपाठ राज्य शासनाने मंजुरी दिली. येत्या रविवारी (ता. ३०) या रुग्णालयाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. या रुग्णालयाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले असून या रुग्णालयाच्या परिसरात त्रिमंदिर संकुलही उभारण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यास दादा भगवान फाऊंडेशनचे दीपक देसाई, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह मंत्री आणि नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.