भाजप वसई रोड शहर अध्यक्षपदी महेश सरवणकर

भाजप वसई रोड शहर अध्यक्षपदी महेश सरवणकर

वसई, ता. २१ (बातमीदार) : भारतीय जनता पार्टी वसई रोड शहर मंडळाच्या अध्यक्षपदी महेश सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सरवणकर भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होते. अनेक आंदोलने, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सक्रिय असल्याने त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपने विश्वास दाखवला असल्याने यापुढे सामाजिक कार्य अधिकाधिक करून नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा घेणार असल्याचे सरवणकर यांनी या वेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com