दुकांनाच्या पाट्यांवरील कारवाईवरून गोंधळ

दुकांनाच्या पाट्यांवरील कारवाईवरून गोंधळ
Published on

वाशी, ता.२७ (बातमीदार)ः दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली आली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अजूनही दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पण या दुकानांवर कारवाई करण्याबाबत कोणतेही परिपत्रक महाराष्ट्र दुकाने व आस्थपना (गुमास्त लायसन्स) काढले नसल्याने इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांवर कारवाई कोणी करायची, याबाबतची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
मराठी पाट्या लावण्याबाबतच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरात कारवाई सुरू आहे. मात्र, अशा दुकानदारांवर कारवाई करण्याचा अधिकार स्थानिक पालिका प्रशासनाला नसल्याची माहिती समोर येत आहे. कारण महाराष्ट्र दुकान आस्थपना (गुमास्त) याबाबतचे कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करताना मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केलेली आहे. पण मुंबई महापालिका स्वतः दुकानदारांना गुमास्त लायसन्स देत असल्यामुळे त्यांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्र प्रांतीक अधिनियमानुसार नवी मुंबई महापालिका दुकानदारांना गुमास्त लायसन्स देत नसल्यामुळे महापालिकेला अशा दुकानांवर कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे पालिकेच्या अधिकांऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या महाराष्ट्र दुकान व आस्थापनाकडून कारवाई करण्याचे परिपत्रक दिले नसल्यामुळे दुकानदारांवर ठोस कारवाई करता येणार नाही.
ः-------------------------------------------
मुंबई महापालिका ही स्वतः दुकानदारांना परवाना देते. त्यामुळे त्यांना दुकानदारांवर कारवाईचा अधिकार आहे. पण नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्र प्रांतीक अधिनियानुसार गुमास्ता परवाना देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अमराठी पाट्यांबद्दल महाराष्ट्र दुकाने व आस्थपनांनी कारवाई करणे आवश्यक आहे.
- शरद पवार, उप-आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com