जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी राबवले आरोग्य शिबीर

जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी राबवले आरोग्य शिबीर

अनुयायांना डॉक्टरांची सेवा
जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी राबवले आरोग्य शिबिर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे रुग्णालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिवसीय शिवाजी पार्क दादर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. १९७८ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम सातत्याने आजही मोठ्या जोमाने सुरू आहे. या शिबिराचे उद्‌घाटन वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभाग सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिराच्या दोन दिवसांत १६०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्या अध्यक्ष सायली हिवराळे यांच्या नेतृत्वात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सिकल सेल अॅनेमियासाठी रक्त तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीमार्फत स्क्रिनिंग करून येणारे रिपोर्ट्स त्या रुग्णांना संपर्क करून कळवले जाणार आहेत.
विद्यार्थी आणि तरुण डॉक्टरांना या सामाजिक उपक्रमांमधून सार्वत्रिक शिक्षण मिळते आणि त्यांच्या प्रगतीसाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. प्रथम वर्षातील एम.बी.बी.एस विद्यार्थिनी तवसिफा जान यांनी सांगितले की, आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थांना प्रथम वर्षातच खूप शिकायला मिळाले. पहिल्यांदा रुग्णांना भेटता आले, त्यांना तज्ज्ञ डॉक्टर काय औषध देतात हे बघता आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com