rode
rodeEsakal

Kalyan-Dombivli: कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी; हा महत्वाचा रस्ता असणार वाहतुकीसाठी बंद

Kalyan-Dombivli: रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना वाहतूक बदल लागू राहणार नाही, असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

Kalyan-Dombivli: ठाकुर्ली चोळेगावातील हनुमान मंदिर ते म्हसोबा चौकदरम्यान रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम तसेच महानगर गॅसचे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामानिमित्ताने म्हसोबा चौक येथे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक करावी, असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजय आफळे यांनी केले.

 rode
Kalyan News : कल्याण बाजारपेठ परिसरात रेड्याचा धुमाकूळ...

डोंबिवली कल्याण अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीसाठी ठाकुर्ली चोळेगाव रस्ता हा मुख्य रस्ता आहे. या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. १ डिसेंबरपासूनच या कामाला प्रारंभ करण्यात येणार होता. काही तांत्रिक कारणामुळे हे काम पालिकेकडून विलंबाने सुरू झाले. ११ डिसेंबरला हे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.

हा मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरील कामे वेळेत पूर्ण करा, अशा सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक आफळे यांनी पालिका अधिकारी, ठेकेदाराला केल्या आहेत. २७ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. तसेच महानगर गॅसचे भूमिगत वाहिन्यांचेदेखील काम असल्याने काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील, असे प्रशासनाने सांगितले.

वाहतूक बदल
ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाकडून वाहने जानू नगर, बालाजी नगरमार्गे ९० फुटी रस्त्याने इच्छित स्थळी जातील. चोळे गावातून येणारी वाहने ९० फुटी वळण रस्ता, बंदिश पॅलेस हॉटेलमार्गे किंवा फशीबाई भोईर चौकातून इच्छित स्थळी जातील. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना वाहतूक बदल लागू राहणार नाही, असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

 rode
Kalyan Crime: शेअर मार्केटच्या नावाने चार कोटी साठ लाखाची फसवणूक; दहा टक्क्याचे आमिष दाखवत फसवणूक

घरडा सर्कलवर भार
घरडा सर्कल येथे रस्तारुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कल्याणकडून येणा-जाणारी बहुतांश वाहने ठाकुर्ली-चोळेगाव रस्त्यावरून डोंबिवलीत ये-जा करत होती. आता हा रस्ता बंद केल्याने या वाहनचालकांना घरडा सर्कल येथून प्रवास करावा लागणार आहे.

घरडा सर्कल येथील कोंडीत आणखी भर पडणार आहे. बुधवारपासून सावळाराम क्रीडा संकुलात आगरी महोत्सव सुरू झाला आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे घरडा सर्कल, ठाकुर्ली भागात कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने या भागात वाहतूक पोलिस तैनात आहेत, असे अजय आफळे यांनी सांगितले.

 rode
Kalyan Loksabha Election : कल्याण लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा? भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com