Railway News: बोर्डी रोड रेल्वे स्थानकात सुविधांची बोंब; रेल्वे प्रवाशांची गैरसोय

Railway News: बोर्डी रोड रेल्वे स्थानकात सुविधांची बोंब; रेल्वे प्रवाशांची गैरसोय

Railway News: रेल्वे प्रशासनाने वाहनांसाठी उड्डाणपूल बांधताना प्रवाशांच्यादृष्टीने कोणतीही मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी विचार केलेला नाही, असा आरोप रेल्वे प्रवासी करीत आहेत

पश्चिम रेल्वेवरील घोलवड आणि उंबरगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान तलासरी तालुक्यातील झााईबोरी गाव ग्रामपंचायत क्षेत्रात असलेले बोर्डी रोड रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.


नवीन रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आल्यामुळे बोर्डी रोड रेल्वे स्थानकाची संपूर्ण रचनाच बदलली आहे. रेल्वे मार्गाच्या दुतर्फा लोखंडी कंपाऊंड केल्यामुळे रेल्वे स्थानकात पूर्व- पश्चिमेला जाण्यासाठी प्रवाशांना धोका पत्करून रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने वाहनांसाठी उड्डाणपूल बांधताना प्रवाशांच्यादृष्टीने कोणतीही मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी विचार केलेला नाही, असा आरोप रेल्वे प्रवासी करीत आहेत. (Western Railway Talasari bordi railway staion problems )

Railway News: बोर्डी रोड रेल्वे स्थानकात सुविधांची बोंब; रेल्वे प्रवाशांची गैरसोय
Kokan : 'कमंडलुतून शिवलिंग,रिकाम्या हातातून रुद्राक्ष', महिलांना सावज बनवणाऱ्या भोंदू बाबांचा असा केला पर्दाफाश

बोर्डी रोड रेल्वे स्थानक १९९४ साली स्थापन झाले. या ठिकाणी कायमस्वरूपी तिकीट खिडकी नाही. तसेच रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेवरून जलद गतीने धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवल्यामुळे जीव मुठीत घेऊन रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहेत. या रेल्वे स्थानकाचा विकास कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन हे रेल्वे स्थानक बंद करू इच्छिते काय, असा सवाल रेल्वे प्रवासी विचारत आहेत.(history of bordi railway staion talasari)


रेल्वे स्थानकाला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र स्थानकात फक्त चार गाड्यांना थांबा दिला गेला आहे. प्रवासी संख्या लक्षात घेता स्थानकात कायमस्वरूपी तिकीट खिडकी व बलसाड फास्ट पॅसेंजर सहित सर्व शटल गाड्यांना थांबा द्यावा अशी येथील प्रवाशांची मागणी आहे. तसेच जुने रेल्वे फाटक बंद केल्यानंतर स्थानकाच्या पूर्व- पश्चिमेला जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात यावे व त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी.(pasengers are not filling well)
राजेंद्र सावे, प्रवासी

Railway News: बोर्डी रोड रेल्वे स्थानकात सुविधांची बोंब; रेल्वे प्रवाशांची गैरसोय
Kokan: शिवसेनेचा ठाकरे गटाला धक्का; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com