अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी ठाण्यातून औषधे

अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी ठाण्यातून औषधे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : जय श्री रामचा जयघोष करत राम मंदिराचा उद्‍घाटन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी लाखो भक्त आयोध्येत येणार आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच रामभक्तांसाठी ठाण्यातून औषधांचा साठा बुधवारपासून टप्प्याटप्याने रवाना होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या निवेदनाचा मान राखत ठाण्याची ‘जेनेरिक आधार’ ही कंपनी अत्यावश्यक औषधांचा मोफत पुरवठा करणार आहे. यामध्ये तापापासून ते हृदयविकारासंबंधित औषधांचा समावेश आहे.
अयोध्या नगरीमध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी राममंदिराचे उद्‍घाटन आणि श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अयोद्ध्या आणि राममंदिर हे समस्त देशवासीयांसाठी श्रद्धेचा विषय असल्याने हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत पन्नास लाख श्रद्धाळू अयोध्यानगरीमध्ये येऊ शकतात. अयोध्या नगरी हे एक छोटेसे शहर असून येथे तब्बल ३ हजार मंदिरे आहेत. प्रवासाचा थकवा, हवामानातील बदलामुळे तसेच कडाक्याच्या थंडीमुळे व खाण्यापिण्यातील बदलामुळे आजारपण येण्याची शक्यता आहे. तरी अशा परिस्थितीत औषधांची गरज भासू शकते. ही जबाबदारी जेनेरिक आधार फार्म कंपनीचे २१ वर्षीय युवा संस्थापक अर्जुन देशपांडे यांनी स्वीकारली आहे. त्यानुसार कंपनीच्या ठाणे येथील मुख्य कार्यालयातून औषधांचा एक ट्रक बुधवारी ३ जानेवारीला रवाना होणार आहे.


या औषधांचा समावेश
तापासाठी पॅरासिटामोल ६५०, वेदनाशामक डायक्लोफेनॅक लिन्सीड ऑईल जेल, अ‍ॅलर्जीसाठी- लेवोसिटीरिझाईन, अँटीबायोटिक-अजिथ्रोमायसिन, मधुमेहसाठी- मेटफॉर्मिन, हृदयरोग- टेलमिसर्टन, उच्च रक्तदाब- अमलोदीपिन, मल्टिव्हिटॅमिन कॅप्सूल्स तसेच पँटोप्राझोल डोंपेरीडॉन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com