tight security is maintained by police for fear of raising black flags nashik news ( file photo )
tight security is maintained by police for fear of raising black flags nashik news ( file photo ) esakal

Police: पोलिसांनी करून दाखवलं; चोरीला गेलेला तीन कोटींचा मुद्देमाल तक्रारदारांना दिला परत

चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची शाश्वती नसते; मात्र अशक्य अशी कामगिरी पोलिसांनी शक्य करून दाखवत कल्याणात प्रथमच ३ कोटींचा मुद्देमाल तक्रारदांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे त्या तक्रारदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. ठाणे पोलिस आयुक्तालयाचे नवनिर्वाचित पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.

tight security is maintained by police for fear of raising black flags nashik news ( file photo )
Nashik Fraud Crime : ‘लतिका’कडे सापडले 11 तोळे सोने; आर्थिक गुन्हेशाखेने घेतली घरझडती

ठाणे पोलिस आयुक्तालय परिमंडळ ३ च्या वतीने पोलिस वर्धापनदिन साप्ताहानिमित्त ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तांतर व हेल्प डेस्क लोकार्पण सोहळ्याचे आयोजन कल्याणात करण्यात आले. परिमंडळ ३ मध्ये रोख रक्कम, सोने – चांदी, मोबाईल, वाहने आणि इतर मिळून एकूण ३ कोटी, १६ लाख, ७९ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत केला. यात सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने, मोबाईल व इतर मुद्देमाल याचा समावेश होता; तर कल्याणमध्ये एका महिलेचा रिक्षात राहिलेला ६ लाखांचा रुपयांचा ऐवज परत केल्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालक मोहन राठोड यांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

tight security is maintained by police for fear of raising black flags nashik news ( file photo )
Nashik Crime: अल्पवयीन बहिण-भावावर अत्याचार; आरोपीला सश्रम कारावास

या वेळी आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे शहर यांच्या हस्ते हेल्प डेस्कचे लोकार्पण आणि मुद्देमाल देण्यात आला. या वेळी दत्तात्रय कराळे पोलिस सहआयुक्त, ठाणे शहर, संजय जाधव अप्पर पोलिस आयुक्त, दत्तत्रय शिंदे अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, सचिन गुंजाळ पोलिस उपायुक्त आदीसह परिमंडळ ३ चे सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

tight security is maintained by police for fear of raising black flags nashik news ( file photo )
Jalgaon Crime News : अट्टल गुन्हेगार 2 वर्षांसाठी हद्दपार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com