voting
votingsakal

Panvel News: तृतीयपंथी, वारांगनांना मिळणार मतदानाचा अधिकार

पनवेल घटनेने १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क नागरिक बजावतात. तो अधिकार वारांगना आणि तृतीयपंथींना मिळावा, यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघ उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल मुडंके, पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांच्यासह निवडणूक विभागाने विशेष प्रयत्न केले आहेत.

पनवेलमध्ये आतापर्यंत ८५ तृतीयपंथी व वारांगनांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे.
तृतीयपंथी हे आपल्या समाजातील घटक असले, तरी अद्यापही त्‍यांना पूर्णपणे स्वीकारण्यात आलेले नाही. त्यांच्याशी माणसांसारखा व्यवहार करण्यात येत नाही. त्यामुळे तृतीयपंथी हे सर्वाधिक उपेक्षितांमध्ये मोडतात. त्यांच्याएवढी हेटाळणी आणि कुचेष्टा कोणत्याही घटकाची होत नाही. त्यांना जगण्याची प्राथमिक संधीही नाकारल्या जातात. कुटुंबातही त्यांना प्रतिष्ठा नसते आणि आपुलकीची ऊबही मिळत नसते. असा चहुबाजूंनी उपेक्षा होणाऱ्या या घटकाला प्रतिष्ठा मिळावी, त्यांना सन्मान मिळावा, त्यांना अपमानास्पद वागणूक मिळू नये, यासाठी काही सामाजिक चळवळी कार्यरत आहेत.

voting
Panvel Crime: पनवेलमध्ये महिलेला लाखोंचा ऑनलाईन गंडा, ६ नायजेरियन गुन्हेगारांना दिल्लीतून अटक

त्या चळवळीला काही अंशी यश आले आहे. त्याच अनुषंगाने तृतीयपंथी यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी तृतीयपंथी व वारांगना महिलांची मतदार नोंदणी करण्यात आली आहे. त्यांचे मतदार यादीत नाव आल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क आगामी निवडणुकीत बजावता येणार आहे. तहसीलदार विजय पाटील यांनी आयोजित केलेल्या शिबिरात लोकपरिषद स्वयंसेवी संस्था आणि आरजू फाऊंडेशन येथील तृतीयपंथींमध्ये तसेच देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यात आली.

त्‍यांच्‍याकडून नमुना नंबर सहाचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच व्होटर ॲपद्वारे मतदार नोंदणी फॉर्म कसे भरावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी २९ तृतीयपंथींची नवमतदार म्हणून नोंद करण्यात आली. त्यानुसार पनवेलमध्ये आत्तापर्यंत ८५ तृतीयपंथी व वारांगनांची मतदार नोंदणी झाली आहे. यानिमित्ताने समाजातील उपेक्षित घटक असलेले तृतीयपंथीय व वारांगना यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पनवेल तहसील करत आहे.

voting
Panvel: पनवेलमध्ये ९३९ झोपडीधारकांना मिळणार हक्काचं घर; पालिका २ हजार ६०० घरे बांधणार

पनवेल तहसीलने केले तृतीयपंथींचे नामकरण
पनवेल तहसीलमार्फत तृतीयपंथींचे मतदार यादीत फक्त नाव नोंदणी केली नाही, तर ज्या तृतीयपंथींना घरच्यांनी नाकारले होते, त्यांना ओळख निर्माण करून देण्याचे काम केले आहे. २९ तृतीयपंथींना पनवेल तहसीलने नाव व पत्ता दिला आहे. त्यामुळे त्यांना नवीन ओळख निर्माण झाली आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना घटनेने मतदानाचा हक्क दिलेला आहे. तृतीय पंथीयांचे नाव मतदार यादीत लावण्याचे आव्हान होते. काही तृतीयपंथीयांना स्वतःचे नाव, गाव, पत्ता काहीच माहिती नव्‍हते. समूहामध्ये ज्या नावाने हाक मारेल तेच नाव पडले होते. अशा वेळी पनवेल तहसीलमार्फत त्‍यांना एक ओळख निर्माण करून दिली आहे.
- विजय पाटील, तहसीलदार, पनवेल

सुरुवातीला आम्ही नकार देत होतो. समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही आसू किंवा नसू समाजाला काही फरक पडत नाही; परंतु अधिकाऱ्यांनी समजावून आम्‍हाला नवीन ओळख दिली.
- माणसी जानी, आरजू फाऊंडेशन

voting
Panvel Rain Update: अतिवृष्टीमुळे पनवेल परिसरात जनजीवन विस्कळीत, महामार्गावर वाहतूक व्यवस्थाही ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com