aasha sevika
aasha sevikaesakal

Anganvadi Sevika: अंगणवाडी सेविकांविरोधात शासनाचा आक्रमक पवित्रा; कारवाईचे सुरूवात

Anganvadi Sevika: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील बालके, कुपोषित बालके, स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संपाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यामुळे संपाची धार अधिकच तीव्र झाली. हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सेवेत हजर न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना बजावणे सुरू केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा देत आहेत. मात्र या वेळी त्यांनी आंदोलनाची धार अधिकच तीव्र केली आहे. ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच अंगणवाडी सेविकांच्या आग्रहाने त्यांनी आझाद मैदानावर त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाची धार अधिकच तीव्र केली आहे. त्या आजही त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्या आहेत. त्यामुळे हा संप मोडीत काढण्यासाठी पालघर जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कामावर हजर होण्यासाठी नोटिसा बजावणे प्रशासनाने सुरू केले आहे.

काही जिल्ह्यांत प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झालेल्या सेविकांना सेवेतून बडतर्फीची कारवाईदेखील केली आहे. त्यांनी सेवेत हजर न झाल्यास सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा पालघर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बजावणे सुरू झाले आहे. याबाबत महिला व बालविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, या कारवाईबाबत काही बोलण्यास अथवा माहिती देण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अंगणवाडी सेविकांना जबरदस्तीने कामावर हजर केले जात आहे. त्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. १२ जानेवारीला पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. तसेच भिवंडी-वाडा-मनोर राज्यमार्गावर वाड्यातील खंडेश्वरी नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. यापुढे आंदोलनाची धार अधिकच तीव्र होणार आहे.
- राजेश सिंग, राज्य संघटक, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com