dawood ibrahim family auction properties buyer delhi lawyer bhupendra kumar bhardwaj
dawood ibrahim family auction properties buyer delhi lawyer bhupendra kumar bhardwajSakal

दाऊदची मालमत्ता खरेदी करणारा दिल्लीचा वकील

तुला आम्ही भीत नाही, हे मला दाऊदला सांगायचे आहे. असे दाऊदच्या मालमत्तेच्या प्रत्येक लिलावात सहभागी होणारे दिल्लीचे भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

मुंबई : फरार दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा जेव्हाही लिलाव होईल, त्या वेळी मी सहभागी होईन. त्याने घडवलेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना मला या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तुला आम्ही भीत नाही, हे मला दाऊदला सांगायचे आहे. असे दाऊदच्या मालमत्तेच्या प्रत्येक लिलावात सहभागी होणारे दिल्लीचे भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

भूपेंद्र कुमार भारद्वाज हे सर्वोच्च न्यायालयात वकिलीचा सराव करतात. त्यांनी काही मोठी प्रकरणेही हाताळली. २०२०मध्ये दाऊद इब्राहिमच्या मुंबके गावातील मालमत्ता खरेदी केल्यानंतर भारद्वाज पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. दाऊदच्या मालमत्तेच्या प्रत्येक लिलावात ते सहभागी झाले आहेत. ६ जानेवारीला आयकर भवनमध्ये झालेल्या लिलावात ते अपयशी ठरले; मात्र यापुढेही मी लिलावात सहभागी होत राहीन, असे ते सांगतात.

२०२० मध्ये झालेल्या सार्वजनिक लिलावात भारद्वाज यांनी दाऊदच्या १० हजार चौरस फूट जमिनीची यशस्वी बोली लावली होती. ९ लाखांत ही मालमत्ता त्यांना मिळाली. आतापर्यंत ते ३ वेळा गावात जाऊन आले. या मालमत्तेतील हापूस आंब्याची बागही त्यांना मिळाली. जे हापूस आंबे कधी काळी दाऊदने चाखले ते आंबे भारद्वाज यांनी गावकरी व पत्रकारांना मोफत वाटले.

मालमत्ता खरेदी केल्यानंतर त्यापुढील नोंदणीचे काम एवढे सोपे नाही, असे भारद्वाज सांगतात. लिलावादरम्यान आपल्या डोक्याला खिळे का ठोकून घेत आहात, असा सवाल पोलिसांनी विचारला होता. हे संपूर्ण गाव दाऊदचे आहे. तुम्हाला कुणी मदत करणार नाही. पत्रकारांनाही असाच सल्ला दिला; मात्र मी घाबरलो नाही. माझ्यावर दबावही आला होता, असे ते सांगतात. मालमत्ता खरेदी करून ३ वर्षे उलटून गेले आहेत. अजूनपर्यंत ही मालमत्तेची नोंदणी भारद्वाज यांच्या नावावर झाली नाही. त्यासाठी ते प्रशासनाला दोषी ठरवतात.

मालमत्ता नोंदणीसाठी अनंत अडचणी

दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेवर लिलावाचा हातोडा पडल्यानंतर खरेदीदारापुढे अनेक कायदेशीर अडचणी असतात. २००० मध्ये पहिल्यांदा दाऊदच्या जप्त मालमत्तांचा सार्वजनिक लिलाव करण्यात आला. मात्र दाऊदच्या भीतीने एकही जण बोली लावण्यासाठी फिरकला नाही. २००१ मध्ये दिल्लीच्या अजय श्रीवास्तव यांनी मुंबईच्या नागपाडा भागातील दाऊदची दोन दुकाने खरेदी केली; मात्र कायदेशीर अडचणीमुळे अजूनपर्यंत हे दुकान त्यांच्या नावावर झाले नाही; तरीही नुकत्याच पार पडलेल्या लिलावात श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता २ कोटीत खरेदी केल्या आहेत. भारद्वाज यांनाही तोच अनुभव आला आहे.

दाऊदच्या खरेदी केलेल्या मालमत्तेतून मला एक पैशाचा नफा मिळवायचा नाही. देशउभारणीचे कुठलेही काम मला सुरू करायचे आहे.
- ॲड. भूपेंद्र कुमार भारद्वाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com