Eknath Shinde  group Uddhav Thackeray news
Eknath Shinde group Uddhav Thackeray newsesakal

Shivsena Mumbai: मुंबईतील ती शाखा नक्की कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?

Shivsena Mumbai: चेंबूर येथील पांजरापोळजवळ असलेल्या वादग्रस्त शाखा क्रमांक १४६ वर शिंदे गट व उद्धव ठाकरे गट आपापला हक्क सांगत होते. या वादाची ठिणगी आज पडली. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद थांबवला. त्यामुळे या शाखेत दोन्ही गटांनी आपले कार्यालय थाटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार तुकाराम काते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक पांजरापोळ येथील शिवसेना शाखा क्रमांक १४६ या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर गर्दी करून आधीच कुलूप असलेल्या कार्यालयाला पुन्हा टाळे ठोकले. पांजरापोळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय आहे. माजी आमदार तुकाराम काते व त्यांची सून माजी नगरसेविका समृद्धी काते यांचेही जनसंपर्क कार्यालय आहे.

Eknath Shinde  group Uddhav Thackeray news
South Mumbai Loksabha News: Milind Deora पंजा सोडणार? Shivsena BJP मध्ये भांडणं लागणार?

काते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी गेले. त्याच वेळी त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाला टाळे लावले होते. काते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी डबल टाळे लावून आरसीएफ पोलिसांना निवेदन दिले होते. कायदेशीर मार्गाने या कार्यालयाचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे द्यावा, अशी मागणी विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी केली होती.

Eknath Shinde  group Uddhav Thackeray news
Shivsena Mumbai: शिंदे - ठाकरे गटात प्रभादेवीत नक्की काय घडलं? तक्रारदार तेलवणेंनी सांगितला घटनाक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com