‘रामायण’ या लहान मुलांसाठीच्या पुस्तक मालिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘रामायण’ या लहान मुलांसाठीच्या पुस्तक मालिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘रामायण’ या लहान मुलांसाठीच्या पुस्तक मालिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन


डोंबिवली, ता. २१ (बातमीदार) : ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या रथयात्रा आणि महाआरतीच्या सोहळ्याप्रसंगी टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने लहान मुलांसाठी तयार केलेल्या ‘रामायण’ या पुस्तक मालिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, निरंजन डावखरे, नरेश म्हस्के, संजय वाघुले व मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते. पुस्तक मालिकेचे प्रकाशनाप्रसंगी टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी व्यवस्थापक अगस्ती लवंड यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत सांगितले, की रामायणासारखे सर्वांना वंदनीय असणारे महाकाव्य लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न असून याप्रसंगी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि त्यांचा पाठिंबा हा आमचा उत्साह द्विगुणित करणारा ठरला आहे. टार्गेट प्रकाशनाची रामायण ही पुस्तक मालिका ही सात भागांमध्ये विभागलेली अद्भुत अशी गाथा आहे. तीन वर्षे आणि त्यापुढील वय असणाऱ्या मुलांपर्यंत रामायण हे अमर भारतीय महाकाव्य पोहोचवणे हा या मालिकेमागील उद्देश आहे. प्रभू रामचंद्रांच्या मनमोहक अशा बालपणातील कथांपासून ते त्यांच्या रावणावरील विजयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास या पुस्तकांमार्फत लहान मुलांसमोर मांडण्यात आला आहे.

..
आकर्षक मांडणी
लहान मुलांना सहज समजेल अशा सोप्या, सुलभ भाषेबरोबरच चित्ताकर्षक अशा चित्रांमुळे ही पुस्तके लहान मुलांना सहज गुंतवून ठेवतील. ओघवत्या भाषेमुळे मुले कथानकाचा आनंद घेऊ शकतील, त्याचबरोबर आकर्षक मांडणीमुळे हा कालातीत ज्ञानाचा खजिना मुलांना कायम लक्षात राहील. याबरोबरच मुलांचे शब्दज्ञान समृद्ध व्हावे यासाठी या पुस्तकांमध्ये काही नवीन शब्दांची पेरणी मोठ्या खुबीने करण्यात आल्याची माहिती या वेळी अगस्ती लवंड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com