central railway 130 km per hour driving test Vidarbha Gitanjali Express will run smoothly nagpur
central railway 130 km per hour driving test Vidarbha Gitanjali Express will run smoothly nagpuresakal

Sevagram Express: सेवाग्राम एक्स्प्रेस धावणार अजुनच वेगात; गाडीला लावले जाणार 'हे' डब्बे!

Sevagram Express: सीएसएमटी ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेस आता एलएचबी डब्यासह धावणार आहे. मध्य रेल्वेने २५ मे २०२४ पासून सेवाग्राम एक्स्प्रेसच्या पारंपारिक डब्याऐवजी अत्याधुनिक एलएचबी (लिंके होल्फमन बुश) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सेवाग्राम एक्स्प्रेसमधून मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

central railway 130 km per hour driving test Vidarbha Gitanjali Express will run smoothly nagpur
Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गुरूवारी पाच तास बंद

सेवाग्राम एक्स्प्रेसला नेहमीच प्रवाशांची पसंती आहे. त्यातच मेल-एक्स्प्रेसचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यावर रेल्वेने भर दिला आहे. त्यासाठी पारंपारिक कोचऐवजी एलएचबी कोचची जोडण्यात येत आहे. भारतीय रेल्वेने १९९५ साली लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी एलएचबी कोच वापरायला सुरूवात केली.

central railway 130 km per hour driving test Vidarbha Gitanjali Express will run smoothly nagpur
Nizamuddin Express : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या फेऱ्या रद्द; काय आहे कारण?

एलएचबी डबे जर्मन कंपनीने तयार केलेले असून त्याचा विस्तार लिंक हॉफमन बश असा आहे. एलएचबी डबे असलेल्या रेल्वेचा अपघात झाल्यानंतर प्रवाशांना गंभीर इजा होत नाही तसेच एलएचबी कोच वजनाने हलके असल्याने गाड्यांचा वेग वाढतो. १२१४० नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस २५ मे पासून तर १२१३९ सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस २६ मे पासून एकूण २२ एलएचबी कोचसह धावणार आहे. यामध्ये दोन एसी, १२ थर्ड एसी इकॉनॉमी, ४ स्लीपर कोचचा समावेश आहेत.

एलएचबी डब्यात वैशिष्ट्ये
• उत्तम गती
• सुरक्षित
• वर्धित आसन क्षमता
• बायो टॉयलेट्स
• उच्च वेगाची कार्यक्षम ब्रेकिंग
• उत्तम वातानुकूलित
• किफायतशीर आणि कमी देखभाल खर्च

central railway 130 km per hour driving test Vidarbha Gitanjali Express will run smoothly nagpur
Pune-Kolhapur Sahyadri Express : पुणे-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसचे काळे बोराटे नगर रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com