Crime
Crimesakal

Thane Crime: एकाच दिवशी दोन चोरींच्या घटनांनी हदरले ठाणे; वाचा संर्पूण माहीती

Manpada : ठाण्याच्या कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मानपाडा ब्रिजवरील बसस्टॉप आणि नौपाडा पोलिस ठाण्याच्या अल्मेडा चौकातील श्री जगन्नाथ एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेसमोर दुचाकीवरील दोघांनी सोनसाखळी चोरण्याची घटना घडली. (Thane Crime:)

Crime
Thane Crime: मुंब्य्रात २२ किलो गांजा जप्त

या दोन्ही घटनांबाबत अज्ञातांविरोधात तक्रार कापूरबावडी व नौपाडा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पोलिस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजेश जेठे (४८) हे मित्रांसोबत कामावरून रात्री ११ वाजता घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. या वेळी काळ्या रंगाच्या स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या अज्ञात दोन आरोपी ८८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून पसार झाले.

Crime
Thane Crime: डॉक्टरच्या हत्येची सुपारी देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

तर सोनसाखळी चोरीची दुसरी घटना सोमवारी (ता. २९) रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने ठाण्याच्या अल्मेडा चौक येथील श्री जगन्नाथ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था समोर घडली.

अनिता प्रदीप साळवी (३८) या चंदनवाडी शिवसेना शाखेजवळ त्यांची मैत्रीण वैशाली श्रीकांत पंदेकर(४५) यांच्यासह शतपावली करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांपैकी एकाने मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. यात चोरटे दोन ग्रॅम सोन्याचा तुकडा खेचून पळाला.

Crime
Thane Crime: डॉक्टरच्या हत्येची सुपारी देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com