eknath shinde maharashtra railway
eknath shinde maharashtra railway sakal

Maharashtra Railway: महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी मिळणार १५ हजार कोटींचा निधी!

Appreciated Union Railway Minister Ashwini Vaishnav concluded that Maharashtra is making good progress since the Shinde government came to the state.

Maharashtra Railway: केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांनी गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. २००९ ते २०१४ या काळात रेल्वेला १,१७१ कोटी रुपये मिळत होते.

यात १३ पटीने वाढ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांना जोरदार गती दिली आहे. तसेच राज्यात शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची चांगली प्रगती होत असल्याचे कौतुकोद्‍गार केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढले. (Rail Budget 2024 Highlights)

eknath shinde maharashtra railway
Nagpur-Wardha Railway: नागपूर-वर्धा तिसऱ्या रेल्वे लाईनला १२५ कोटी; अर्थसंकल्पात तरतूद, प्रकल्पाला मिळणार गती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प गुरुवारी लोकसभेत सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, की अर्थसंकल्पात रेल्वेचे २ लाख ५२ हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कामे संथ गतीने होत होती. अनेक प्रकल्प रखडले होते; पण आता शिंदे सरकार येताच राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळाली आहे. (Indian Rail Budget 2024)

अमृत स्थानक योजनेंतर्गत महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. महाराष्ट्रात रेल्वेचे ९८ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्याची माहितीही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पात पाचोरा-जामनेर ब्रॉड गेज रूपांतरणासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

eknath shinde maharashtra railway
Badlapur Railway Station : होम प्लॅटफॉर्म अरुंद असताना एक नंबर प्लॅटफॉर्म बंद करु देणार नाही, प्रवासी संतप्त!

मध्य रेल्वेला १० हजार ६११ कोटी रुपये
मध्य रेल्वेला यंदाच्या अर्थसंकल्पात १० हजार ६११ कोटी रुपयांचा भरीव निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षी २०२३-२४ मध्ये १० हजार ६०० कोटी रुपये निधी दिला होता. रुळांच्या दुरुस्तीसाठी १ हजार २२ कोटी, पूल-बोगद्यांसाठी १ हजार ३२० कोटी, सिग्नल यंत्रणेसाठी १८३ कोटी, विद्युतीकरण प्रकल्पांसाठी ३३८ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

eknath shinde maharashtra railway
Budget 2024 Railway: 40 हजार रेल्वे बोगी 'वंदे भारत'मध्ये बदलणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

पश्चिम रेल्वेला १८ हजार ९३ कोटी
अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेला विविध कामांसाठी १८ हजार ९३ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या वर्षी १४ हजार ३३५ कोटी रुपये अर्थसंकल्पातून देण्यात आले होते. यात नवीन रेल्वे मार्गिका, रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणाकरिता ५ हजार १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

रोड ओव्हर पुलाकरिता १ हजार १९६ कोटी, प्रवासी सुविधांसाठी १ हजार १३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबई-दिल्ली मार्गावर गाड्यांचा वेग प्रतितास १६० ते २०० किलोमीटर असा वाढविण्यासाठी २ हजार ६६२ कोटी रुपयेही अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत.(New Trains Latest News Highlights)

नवीन रेल्वे मार्गिका
मार्गिका अंतर तरतूद
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ २५० किमी २७५ कोटी
वर्धा-नांदेड (व्हाया यवतमाळ-पुसद) २७० किमी ७५०कोटी
बारामती-लोणंद ५४ किमी ३३० कोटी
धुळे-नंदुरबार ५० किमी १०० कोटी
सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर ८४ किमी २२५ कोटी
कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर २८ किमी १० कोटी

eknath shinde maharashtra railway
Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! मालगाडीचे इंजिन दोनदा पडले बंद

या मार्गाचा विस्तार (दुहेरीकरण) : एकूण १,६१५ कोटी
मार्ग अंतर तरतूद
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका ६८ किमी १२५ कोटी
वर्धा-बल्लारशहा तिसरी मार्गिका १३२ किमी २०० कोटी
इटारसी-नागपूर २८० किमी ३२० कोटी
पुणे-मिरज-लोढा दुहेरीकरण ४६७ किमी २०० कोटी
दौंड-मनमाड दुहेरीकरण २४७ किमी ३०० कोटी
वर्धा-नागपूर चौथी मार्गिका ७९ किमी १२० कोटी
जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका २४ किमी ४० कोटी
मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका १६० किमी १२० कोटी

यार्ड रिमॉडेलिंग
स्थानक तरतूद
कसारा १ कोटी
कर्जत १० कोटी
पुणे २५ कोटी

वाहतूक सुविधा
पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनल : १० कोटी
सीएसएमटी येथील फलाट क्र. १० ते १३ची लांबी वाढविणे : १० कोटी
एलटीटी टर्मिनस : ५ कोटी (Budget 2024 News)

eknath shinde maharashtra railway
Sangli Railway : सांगली रेल्वे स्थानकासाठी 24 जानेवारीला जनआंदोलनाचा इशारा; कसे असेल आंदोलन?

पादचारी पूल/रोड ओव्हर पूल
विक्रोळी रोड ओव्हर पूल : ५ कोटी
दिवा रोड ओव्हर पूल : ५ कोटी
दिवा-वसई रोड ओव्हर पूल : ९ कोटी
दिवा-पनवेल रोड ओव्हर पूल : ३ कोटी
कल्याण-इगतपुरी रोड ओव्हर पूल : १६.१ कोटी (Budget Record Maharashtra for rail works says Ashwini Vaishnaw )

eknath shinde maharashtra railway
Railway: दादर स्थानकांत कॉंग्रेसतर्फे रेल रोको आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com