पारंपरिक मासळीचा खवय्यांना पर्याय

पारंपरिक मासळीचा खवय्यांना पर्याय

उरण, ता. १४ (बातमीदार)ः उरण समुद्रसपाटीला असणारा परिसर आहे. त्यामुळे समुद्र तसेच खाडीचे मासे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. अशातच थंडीमुळे सध्या समुद्रातील माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे खाडीतील मासे या कालावधीत बाजारात विक्रीसाठी येतात. त्यात शिंपल्यातील पारंपरिक खुबे तसेच खाडीचा कोलीम खवय्यांसाठी चांगला पर्याय ठरत आहे.
कोलीम म्हणजे कोळंबीच्या जन्माची पहिली पायरी. कोलीम इतका बारीक असतो. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी जाळ्याऐवजी कपडा वापरला जातो. तेल, कांदा, लसूण, तिखट, हळद घालून परतलेला कोलीम चवीला अप्रतिम असतो. कोलमाची वडी करतात. सुक्या कोलमाच्या पापडाला ‘पेंडी’ म्हणतात. या पेंडी तव्यावर किंवा चुलीत भाजून खाल्ल्या जातात. कोलीम निवडण्यासाठी अगरबत्तीची काडी घेऊन तांदळासारखा निवडावा लागतो, तर शिंपल्याच्या जातीत आढळणारे खुबे चिखलात सापडत असल्यामुळे पाण्यातून स्वच्छ धुतले जातात. पाण्यात उकडल्यानंतर त्याचा गर काढून लसूण, कांदा, टोमॅटोसह हळद मसाल्यावर परतून भाकरीसोबत खाल्ले जातात.
----------------------------
विशिष्ट कालावधीतच उपलब्ध
पारंपरिक व पूर्वापार मिळणाऱ्या कोलीम, खुबे पकडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच विशिष्ट कालावधीत मिळणाऱ्या मासळीच्या जातीमुळे नागरिकांना नेहमी खाण्यासाठी मिळत नाही. त्यामुळे थंडीचा कालावधी संपल्यावर बाजारात उपलब्ध होणाऱ्या कोलीम, खुबे यांना उरणच्या शहरी तसेच ग्रामीण भागात मोठी मागणी आहे.
-----------------------------
कोलीम, खुबे बाजारात नेहमी उपलब्ध होत नाहीत. फेब्रुवारीपासून मार्चपर्यंत खाडीतील मासळीचा हा प्रकार बाजारात विक्रीसाठी येतो. समुद्राची इतर मासळी तर कधीही उपलब्ध होते. मात्र, कधीकाळी मिळणाऱ्या या माशांची नेहमी वाट बघतो.
- धनेश पाटील, खवय्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com