Fairness Cream Kidney problem
Fairness Cream Kidney problemesakal

Fairness Cream: फेअरनेस क्रीममुळे रायगड येथे दोन जणांना किडनी विकार, काय आहे प्रकरण ? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

कोणतीही उत्पादने वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांचे दुष्परिणाम जाणून घ्यावेत, असा सल्ला डॉ. अमित लंगोटे यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता वेगवेगळ्या जाहिराती पाहून मलम अथवा ऑईल वापरतात. निकृष्‍ट दर्जाचे हर्बल फेअरनेस क्रीम वापरल्यामुळे रायगड जिल्ह्यातील दोघांना किडनी विकार झाल्याचे निदान झाले आहे. नवी मुंबईतील मेडिकव्‍हर हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे हे या रुग्णांवर उपचार करत आहेत.

Fairness creams cause kidney disease in two individuals

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेअरनेस क्रीमचा वापर करतात. मात्र, त्याच वेळी त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष केले जाते. या दुर्लक्षामुळेच या दोन रुग्णांना फेअरनेस क्रीम्समधील विषारी घटकांमुळे मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागले. पाऱ्यासारख्या हानिकारक घटकाने त्यांचा घात केला.

२४ वर्षीय नमिता शिंदे (नाव बदलले आहे) ही रुग्ण आठ महिन्यांहून अधिक काळ स्थानिक डॉक्टरांनी लिहून दिलेली हर्बल फेअरनेस क्रीम वापरत होती, तर ५६ वर्षीय रमेश मोरे (नाव बदलले आहे) हे तीन-चार महिन्यांपासून केस कापणाऱ्या कारागिराने लिहून दिलेले क्रीम वापरत होते. सुरुवातीला या दोघांच्या शरीरावर सूज आल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

डॉ. अमित लंगोटे यांनी सांगितले की, सुरुवातीला रुग्णांच्या शरीरावर सूज आणि लघवीत मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळून आली. क्रीममधील विषारी घटक आणि धातूंमुळे त्यांच्या किडनी बायोप्सीमध्ये मेमब्रेनस नेफ्रोपॅथीचे निदान झाले. ज्यात एनईएलएल- १ अँटीजन (कर्करोग किंवा हेवी मेटल संबंधित असते) आढळले. मोरे यांची सुरुवातीला कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली होती. त्यांनी पाच महिने क्रीम वापरल्याचे सांगितले.

पुढील तपासणीत त्याच्या रक्तातील पारा (मर्क्युरी) वाढल्याचे आढळले. शिंदे यांचीही एनईएलएल-१ अँटीजन चाचणी सकारात्मक आली. तिनेही स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ती विदेशी फेअरनेस क्रीम वापरत असल्याचे सांगितले. तिच्या रक्तातील पाराही (मर्क्युरी) वाढल्याचे आढळले. वेळीच औषधोपचारांमुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता आली आहे.
Fairness creams and their dark, heavy secrets: Know how they impact your kidney

एफडीए मान्यता प्राप्त क्रीम वापरा
क्रीममधील उच्च पारा (मर्क्युरी) त्वचेच्या रंगद्रव्यासाठी जबाबदार असलेल्या त्वचेतील मेलेनोसाइट्सवर परिणाम करते. होम बेस क्रीम्समध्ये (सलूनमध्ये विक्री होणारे) अनेकदा पाऱ्याचा (मर्क्युरी) वापर करतात. ज्यामुळे किडनीचे आरोग्य आणि आरोग्य धोक्यात येते. योग्य तज्ज्ञांच्या परवानगीशिवाय आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मान्यताप्राप्त क्रीम्सची निवड करणे आवश्‍यक आहे.

बहुतांश क्रीममधील विषारी धातू/पारा (मर्क्युरी) दर्शवले जात नाहीत. हर्बलचे लेबल लावून ती विकली जात असल्याने ग्राहकांची फसगत होते. कोणतीही उत्पादने वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांचे दुष्परिणाम जाणून घ्यावेत, असा सल्ला डॉ. अमित लंगोटे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com