Mango News
Mango Newssakal

Mango News: कोकणातल्या आंब्याना मिळत आहे 'या' देशांमध्ये पसंती; परदेशवारी सुरू

Navi Mumbai News: फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात हापूस आंब्याने हजेरी लावली आहे. त्यामुळे बाजारात आंब्याचा सुगंध दरवळू लागला आहे. शिवाय आंबा निर्यातीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. (vashi market News)

त्यानुसार या आठवड्यापासून आखाती देशात आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंब्याचा गोडवा आता सातासमुद्रापार दरवळू लागला आहे. फेब्रुवारी- मार्चपासून हापूस आंब्याच्या हंगामाची प्रतीक्षा सर्व व्यापाऱ्यांना आणि आंबा खवय्यांनाही असते.(mango news)

Mango News
Navi Mumbai News: 'एनएमएमटी'ची उरण बस सेवा बंद; हजारो प्रवाशांना फटका

यावर्षी १० फेब्रुवारीपासून आंब्याच्या पहिल्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार कोकणातून हापूस आंब्याच्या चार ते पाच हजार पेट्यांची आवक बाजारात दररोज होत आहे. हळूहळू दररोज ही आवक वाढत आहे.(mango news)

त्यानुसार आखाती देशातही आंबा निर्यात सुरू करण्यात आली आहे. दर दोन ते तीन दिवसांत हापूस आंबा आखाती देशासाठी रवाना होत आहे. सध्या आंब्याचे दर चढे आहेत. पूर्ण हंगामातील ७५ टक्के हापूस आंबा हा दुबई, कतारसारख्या आखाती देशात जातो.(mumbai news)

Mango News
Navi Mumbai News: दोन बांगलादेशींना खिडुकपाड्यातून अटक

तर २५ टक्के आंबा हा युरोप, अमेरिका या ठिकाणी पाठवला जातो. आखाती देश हापूस आंब्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आंबा निर्यात नेहमी आखाती देशातूनच सुरू होते. त्यानुसार यावर्षीची सुरुवात झाली आहे. समुद्री मार्गाने मोठ्या प्रमाणावर आंबा आखाती देशासाठी रवाना होत आहे.


विशेष म्‍हणजे, आखाती देशात आंबा पाठवण्यासाठी फळांवर कोणत्‍याही प्रकारची प्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे आंबा पाठवण्याचा खर्च कमी येतो. त्यामुळे निर्यातदारांवर आर्थिक भार कमी असतो. शिवाय आखाती देशांमध्ये हापूस आंब्‍याला सर्वाधिक मागणी असते.(latest Maharashtra News)

Mango News
Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या


या आठवड्यापासून आखाती देशासाठी आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. सध्या आवक कमी असल्‍याने निर्यातदेखील कमी होत आहे. जशी आवक वाढेल तशी निर्यात वाढण्याची शक्‍यता आहे.(latest Mango news)


-मोहन डोंगरे, आंबा निर्यातदार

Mango News
Navi Mumbai News : नवी मुंबईकर खोकल्याने बेजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com