Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis News sakal

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी

यूट्युब चॅनलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपात मुलाखत देणारी व्यक्ती व वापरकर्त्याविरोधात सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : यूट्युब चॅनलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपात मुलाखत देणारी व्यक्ती व वापरकर्त्याविरोधात सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन समाजामध्ये दंगा भडकवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्य करणे व सार्वजनिक शांतता भंग होईल असे विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे, ता. २९ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांना 'तुम्ही आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा.' तसेच विशिष्ट जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन जातींमध्ये द्वेष भावना निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत विश्वजीत दुर्गादास देशपांडे (वय ४१, सनसिटी रस्ता, वडगाव बु.) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावरील एका चॅनेलवरून ही धमकी देण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रसारित करण्यात आलेल्या क्लिपमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com