बँकेच्या लॉकरमधून कोट्यवधीचे दागिने चोरणाऱ्या व्यवस्थापकाला अटक

बँकेच्या लॉकरमधून कोट्यवधीचे दागिने चोरणाऱ्या व्यवस्थापकाला अटक
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : स्टेट बँकेच्या लॉकरमधून सुमारे तीन कोटी रुपयांचे चार किलो सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली सेवा व्यवस्थापकाला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. मनोज म्हस्के असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून तो मुलुंड शाखेत कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी भांडुप पोलिस ठाण्यात बँकेचे अधिकारी अमित कुमार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपी मनोज म्हस्के बँकेच्या गोल्ड लोन विभागात कार्यरत आहे. तक्रारदार अधिकारी अमित कुमार यांना म्हस्के रजेवर असताना शाखेच्या सोन्याच्या लॉकरची जबाबदारी आणि ताबा देण्यात आला होता. तेव्हा अमित कुमार यांना यातील सोन्याच्या दागिन्यांची काही पॅकेट तेथे नसल्याचे लक्षात आले. तेव्हा कुमार यांनी ताबडतोब म्हस्के यांना फोन करून त्यांची तपासणी केली. तेव्हा म्हस्के याने ऑक्टोबर २०२३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ठेवलेले ‘सोने तात्पुरते काढून घेतल्याची’ कबुली दिली. म्हस्के यांनी कुमार यांना आठवडाभरात सोने परत करण्याचे आश्वासन दिले. कुमार यांनी नंतर त्यांच्या वरिष्ठांना माहिती दिली. म्हस्के यांना शाखेत बोलावले असता त्यांनी हजर राहून काही वेळात सोने परत करण्याचे आश्वासन दिले; परंतु म्हस्के यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यानंतर अमित कुमार यांनी भांडुप पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी म्हस्के याला अटक करून सोन्याचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com